शेतकरी परिवर्तन पॅनलच्या १८ उमेदवारांच्या हातात घोटी बाजार समितीची सत्ता येणार : इगतपुरी तालुक्यात मिळतोय प्रचंड पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षानुवर्ष शेतकरी नाडला जात आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीत विविध योजना राबविण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनलचे १८ उमेदवार सक्षम उमेदवारी करीत आहेत. बाजार समितीच्या आणि सामान्य शेतकऱ्यांच्या विकासासाठी बांधील असल्याचे सर्व उमेदवारांचे वचन आहे. सर्वच उमेदवारांनी इगतपुरी तालुक्यात उत्तमोत्तम कामगिरी केलेली आहे. शेतकऱ्यांना शाश्वत विकासाच्या मधुर फळांपासून वंचित ठेवलेले असून संबंधितांना धडा शिकवण्यासाठी घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी निश्चय केला असल्याने सर्व १८ उमेदवार बाजार समितीमध्ये सत्ता स्थापन करतील. २८ एप्रिलला सर्वांना मतदान करून निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेते माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, रतनकुमार इचम, पांडुरंग बऱ्हे, संदीप किर्वे, भास्कर गुंजाळ, उमेश खातळे, ॲड. एन. पी. चव्हाण आदींसह विविध पदाधिकाऱ्यांना इगतपुरी तालुक्यात अभूतपूर्व पाठिंबा लाभत आहे. वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणेघेणे नसणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा हक्काचे लोकप्रतिनिधी देण्यासाठी सक्षम उमेदवार पॅनलकडून देण्यात आले आहेत. जिथे जिथे शेतकर्‍यांच्या हिताचा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा आक्रमकपणे हे उमेदवार लढा देतील..इगतपुरी तालुक्यातील सर्व मतदारांच्या सहकार्यातून घोटी बाजार समितीला आदर्श मार्केट कमिटी म्हणुन नावलौकीक मिळवून देण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. पॅनलची निशाणी गॅस सिलेंडर असून २८ एप्रिलला कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता गॅस सिलेंडर निशाणीवर ठसा मारून निवडून द्यावे असे आवाहन शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेते माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, रतनकुमार इचम, पांडुरंग बऱ्हे, संदीप किर्वे, भास्कर गुंजाळ, उमेश खातळे, ॲड. एन. पी. चव्हाण आदींनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!