इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
नांदगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ देवबांध या सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ५ वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, पर्यावरण पूरक पिशवी, पट्टी इत्यादी शैक्षणिन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा शिरसाठ, उपाध्यक्ष सुभाष दशरथ गायकर, सदस्य नारायण गायकर, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, मोतीलाल ठाकरे, तानाजी गायकर, भाग्यश्री गायकर, मीना पागेरे, सारिका शिरसाट, आशा संधान, लक्ष्मी पावडे, मधु पागेरे, संजू पाळदे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वांना मोफत लेखन साहित्य मिळाल्याबद्दल त्यांना आनंद झाला. मुख्याध्यापक बालसिंग परदेशी, नितीन पवार, राजू साळुंखे, भारती माटे, अशोक मोरे, राजेंद्र पवार, उमेश बैरागी यांनी मोफत साहित्य वाटप केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.