घराची पडझड झालेल्या भंडारदरावाडीच्या आदिवासी कुटुंबाला आर्थिक मदत : खंडेराव झनकर, नवनाथ झनकर यांचा पुढाकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

इगतपुरी तालुक्यात अति पावसाने घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोळ्या देखत घरातील संसारपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्याने नुकसानग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या डोळ्यात आसवांची दाटी निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्वभागातील भंडारदरावाडी येथील वयोवृद्ध कुटुंब विठ्ठल रावजी बेंडकोळी हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परिस्थिती गरिबीची त्यातच घरातील धान्यासह संसारपोयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. शासनाच्या मदतीच्या भरवशावर अवलंबून न राहता सामाजिक दायित्व दाखवत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर, नवनाथ झनकर यांनी घराची पडझड झालेल्या बेेघर वयोवृद्ध कुटुंबाला घरातील किराणा बाजारासह आर्थिक मदत करीत आधार दिला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भंडारदरावाडी येथील रहिवासी असलेले विठ्ठल रावजी बेंडकोळी याचे घर पूर्णपणे दबून जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा पूर्ण संसार पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर आणि नवनाथ झनकर यांना दिली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता किंवा सरकारी पातळीवर मदतीची वाट न बघता सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आदिवासी कुटुंबाला मदत केली. भंडारदरावाडी, भरवीर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!