इगतपुरीच्या १५ वर्षीय “सुजल”चा पाण्यात बुडाल्याने मृत्यु

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी शहरातील नगरपालिका तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. रविवारी दि. ४ ला दुपारी ४ च्या सुमारास इगतपुरी येथील नगरपालिका तलावात हा मुलगा बुडाल्याची घटना घडली होती. त्याच्यासोबत भाऊ आणि इतर काही मित्र असल्याचे समजते. आज सकाळी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालवली.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरातील पंढरपूरवाडी येथे राहणारा सुजल ( हिमेश ) अनिल पार्टे हा १५ वर्षाचा मुलगा आपले मित्र आणि भाऊ यांच्यासमवेत इगतपुरी येथील नगरपालिका तलावात पोहायला गेला होता. दि. ४ ला रविवारी दुपारी ४ च्या सुमारास तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये बुडाला. प्रत्यक्षदर्शींनी मदतकार्य करून त्याला बाहेर काढत इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने आज सकाळी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!