इगतपुरी तालुक्यात कोसळधार सुरूच ; शेतांनाही नद्यांचे स्वरूप : पावसामुळे जनजीवन विस्कळीत ; नागरिकांनी नाहक बाहेर पडू नये

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

इगतपुरी तालुक्यात पावसाची कोसळधार सुरूच असून नदी, नाले, धरण तुडुंब भरले आहेत. शेतांमध्ये सुद्धा पावसाचे पाणी साचून शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून ह्याचा सर्वाधिक फटका आदिवासी भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण रस्त्यांची अवस्था सुद्धा अतिपावसाने केविलवाणी झाली आहे. बाजारपेठांवर परिणाम झाला असून जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. भातांची रोपे सडण्याचा धोका आणि दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. पर्यटकांना इगतपुरी तालुक्यातील आजच वन विभागाने मज्जाव केला आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

विडिओ पहा

Leave a Reply

error: Content is protected !!