विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे – प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

विद्यार्थ्यांनी पदवी मिळवत असतानाच आपले भवितव्य घडविण्यासाठी योग्य संधीचा अभ्यास करून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजासाठी आपले काही देणे लागते याचेही भान ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. वाय. सोनवणे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा सतत उपयोग आपल्या भविष्यासाठी करुन घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. ए. वाय. सोनवणे, अपूर्वा पाटील, संध्या गव्हाणे, पवन कडू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. एस. के. शेळके, प्रा. एल. सी. देवरे, प्रा. जे. आर. भोर, प्रा. आर. आर. जगताप, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. आर. डी. शिंदे, प्रा. एम. आर. देबाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिका पाळदे यांनी तर आभार अनुष्का ठाकरे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!