खाऊन घेतलेल्या अर्ध्या रस्त्याची तक्रार करताच ठेकेदाराकडून झाले रस्त्याचे काम : ग्रामपंचायतीच्या सतर्कतेमुळे ११ लाख ६० हजाराचा रस्ता झाला पूर्ण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो बोर्ली मानवेढे भावली खुर्द ह्या नावाचा वाघ्याचीवाडी येथील खाऊन घेतलेला अर्धा रस्ता संबंधित ठेकेदाराने पूर्ण करून दिला आहे. बोर्ली आणि मानवेढेचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने ११ लाख ६० हजाराचा रस्ता पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यासंदर्भात तक्रार अर्ज आल्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत खाऊन घेतलेला अर्धा रस्ता पूर्ण करून दिला. आधी केलेला अर्धा रस्ता दोन महिन्यात उखडून गेला असून तो व्यवस्थित करावा अशीही मागणी होत आहे. खाल्लेल्या रस्त्याची बाब दोन महिन्यांनी उघडकीस आली होती. याच ठेकेदाराकडे धामडकीवाडी येथील चोरीला गेलेल्या रस्त्याचे काम आहे. हे काम सुद्धा त्याला करावे लागणार असून प्रशासन आणि अधिकारी त्याला पाठीशी घालत आहे असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी बोर्ली आणि मानवेढे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यापुढील काळात खाऊन घेतलेले रस्ते आणि शासकीय निधीतील कामांना प्रकाशझोतात आणणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!