
इगतपुरीनामा न्यूज – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. आज पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला. ह्या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. ह्या अपघातात एमएच ०२ ईएक्स ६७७७ ह्या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी यांनी अपघाताची माहिती समजताच मदतकार्य केले.