लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहे. सण उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात मग आपणही अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण उत्सव साजरे करावे असे आवाहन घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. घोटी येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. खेडकर पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट पडतात. यातून मतभेद निर्माण होतात. जास्त पोस्ट तरुण वर्ग व्हायरल करतात. तरुण वर्गाला या गोष्टींचे परिणाम ज्येष्ठ नागरिकांनी समजावून सांगावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आम्ही आहोत आपण सर्वांनी सण आनंदात साजरे करा. खाकी हीच आमची जात व धर्म असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा. चांगल्या कार्यात बाधा आणणार्यांची गय केली जाणार नाही. त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आगामी बकरी बकरी ईद सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सण उत्सव साजरे करताना धार्मिक सलोखा कायम राखावा. शासनाच्या नियमांचे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता तसेच सामाजिक बांधिलकी या निमित्ताने जोपासली जावी या उद्देशाने बैठक बोलावली गेली होती. यावेळी घोटी शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते