नाशिकच्या लॉटरी सेंटरमधून विक्री झालेल्या तिकिटामुळे एक भाग्यवंत झाला करोडपती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

जुने सीबीएस नाशिक येथील लॉटरी स्टॉलवरून विक्री झालेल्या तिकिटाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. नाशिक येथे अंकुश वोरा यांचे मॅजिस्टिक बुक स्टॉल आहे. या स्टॉलवर महाराष्ट्रासह विविध राज्यातील सरकारमान्य लॉटरी तिकिटांची विक्री केली जाते. या आठवड्यात एका ग्राहकाने ६ रुपये किमतीचे नागालँड स्टेट लॉटरीचे एक तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीचा निकाल जाहीर झाला. एका नशीबवान ग्राहकास चक्क एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले.

हे वृत्त कळताच नागालँड स्टेट लॉटरीचे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसचे राजेश मदान, आनंद मवानी हे नाशिकला आले. त्यांनी लॉटरी स्टॉलचे संचालक अंकुश वोरा यांचे अभिनंदन केले. नाशिकमधून लॉटरी तिकीट खरेदी केलेल्या अज्ञात ग्राहकास एक कोटींचे बक्षीस लागल्याने लॉटरीची विश्वासार्हता वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे अंकुश वोरा म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!