मुकणे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना कै. शेवंताबाई वेल्हाळ यांच्या स्मरणार्थ गौरवचिन्ह देऊन सन्मान

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

मुकणे येथील एमपीजी विद्यालयातील इयत्ता १० वीत उत्तीर्ण झालेल्या प्रथम ५ विद्यार्थ्यांना कै. शेवंताबाई वेल्हाळ यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १० वी वार्षिक परीक्षेचा चांगला निकाल लावला असुन त्यात साक्षी सखाराम वेल्हाळ ही ८९ टक्के गुण मिळवुन प्रथम आली. प्रिया संतोष उबाळे ही ८७.६० टक्के द्वितीय, पुजा बाळु खांदवे ही ८७.२० टक्के तृतीय, अक्षदा नारायण गोवर्धने ही ८७ टक्के चतुर्थ तर तनुजा संजय राव ही ८५ टक्के मिळवुन पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या पाचही गुणवंत विद्यार्थिनींना कै. शेवंताबाई पिलाजी वेल्हाळ यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावर्षीपासुन प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करणार असल्याचे आयोजक भाऊसाहेब वेल्हाळ व सुभाष वेल्हाळ यांनी सांगितले. तर याचवेळी कंपनी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक राव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी. एस. जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक राव, भाऊसाहेब वेल्हाळ, सुभाष वेल्हाळ, विष्णु वेल्हाळ, नारायण वेल्हाळ, सखाराम वेल्हाळ, चेतन वेल्हाळ, डी. आर. तेलोरे, एस. टी. वाणी, एस. एन. कांडेकर, देशमुख, ओमानंद घारे, खैरनार, बी. एस. शिंदे, पी. एस. निर्मळ आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश महाजन यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!