बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली ; बाजारभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8 ( निलेश काळे )
इगतपुरी तालुक्यात भातानंतर विविध फळभाज्या आणि पालेभाज्यांची पिके घेतली जातात. गतवर्षीच्या हंगामात कोरोनामुळे शेतकऱ्यांचा पिकवलेला शेतमाल बांधावर फेकला गेला. यंदा कुठे सुगीचे दिवस दिसत होते तोच शेतमालाचे बाजारभाव पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नाशिकनंतर जवळचे भाजीपाला मार्केट म्हणून घोटीकडे पाहिले जाते. मार्च महिन्याच्या मध्यानंतर फळभाज्या व भाजीपाला आदींना चांगले भाव मिळत असतांना मार्च अखेर सर्व दर कोसळले आहेत.
घोटी बाजार समितीने वाहतुकीची कोंडी आणि कोरोनामुळे बाजार खंबाळे गावाजवळ स्थलांतर केले. महामार्गाच्या जवळ असल्याने व्यापारीवर्ग बरेच येत होते. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस उत्तम दर मिळाला. यामुळे सिन्नर, निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन भाजीपाल्याची प्रचंड आवक वाढली. ह्या कारणामुळे भाव कोसळायला निमित्त मिळाले. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. भाजीपाला मार्केट महामार्गालगत आल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्तमात-उत्तम दर मिळतील ही अपेक्षा फोल ठरली.
तुलनात्मक दर
पूर्वीचे दर, कंसात आताचे दर
◆ टोमॅटो ४५० ( २८० )
◆ दोडका ४०० ( २५० )
◆ काकडी ४७५ ( ३५० )
◆ कारले ४५० ( ३६० )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!