
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – अस्सल गावरान आणि जंगली भागातले विश्वसनीय मध प्रत्येक जाणकार व्यक्तीला हवे असते. इगतपुरीसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील जंगलामधून संकलित केलेले मध तर अतिशय लोकप्रिय आहे. नाशकातील विविध ठिकाणच्या प्रदर्शनात ह्या मधाला नागरिकांनी अव्वल दर्जा दिलेला आहे. पर्यटननगरी संबोधल्या जाणाऱ्या इगतपुरीत ह्याच जंगली मधाची मुबलक उपलब्धता झाली आहे. HBB सह्याद्रीच्या रानमेवा ह्या दुकानात आजपासून अस्सल मध विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. आज ह्या दुकानाचा शुभारंभ इगतपुरी येथील साई भारत आनंद गॅसचे संचालक आनंद चांडक यांच्या हस्ते करण्यात आला. खादी ग्रामोद्योग संघाचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, संचालक पत्रकार भास्कर सोनवणे, भगीरथ भगत, रामहरी जाधव सागर हांडोरे, पत्रकार वाल्मिक गवांदे, भरत हाडप आदी मान्यवर यावेळी हजर होते. आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून त्यासाठी गावरान मधाला खूप महत्व आहे. इगतपुरीत मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले अस्सल मध सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे आनंद चांडक यांनी यावेळी सांगितले. 8600042888 ह्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती आणि मधाची उपलब्धता याबाबत माहिती दिली जाईल. तालुक्यातील विविध भागात आदिवासी महिला आणि नागरिकांकडून जमा केलेले मध या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
