इगतपुरीनामा न्यूज, दि. २
कृषी दिनाच्या निमित्ताने शिरसाठे ग्रामपंचायतीने बिया आणि रोपांच्या माध्यमातून किमान २ लाख लागवड करून संवर्धनाचा संकल्प केला आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियानात पृथ्वी या घटकामध्ये राज्यस्तरीय विशेष पुरस्कार आणि नाशिक विभागात प्रथम पारितोषिक विजेती ग्रामपंचायत म्हणून शिरसाठे गाव सुप्रसिध्द आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि महिला बचत गटाने ह्या संकल्पासाठी सर्वांगीण सहभाग घेणार असल्याचे ठरवण्यात आले. शिरसाठे गावाने पर्यावरण संवर्धनासाठी केलेली आणि करीत असलेली कामगिरी उल्लेखनीय आहे असे कौतुक इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी केले.
यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार, सरपंच गोकुळ नामदेव सदगीर, उपसरपंच शीतल विलास चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य तारा गणेश तेलंग, श्यामसुंदर कारभारी सोपनर, रमेश काशीनाथ शिद, अलकाबाई देवराम दोंदे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सभासद महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.