धामणी विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विजय उपाध्ये सेवानिवृत्त

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १

शालेय अभ्यासक्रमाबरोबरीने नीतिमूल्ये मुलांनी अवगत करावी असा नेहमी अट्टाहास नेहमी असणारे विजय रामबिलास उपाध्ये हे श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले विद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नोकरीची सलग ३५ वर्षे सेवा धामणी विद्यालयात केली असून ३२ वर्षे उपशिक्षक व निवृत्तीसमयी ३ वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. मुलांचे पहिले पालक आई वडील असले तरीही शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक असतात. नीतीमूल्याने परिपूर्ण विद्यार्थी घडवूनच शिक्षक विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगतात परिपक्व करून निरोप देतात. उपाध्ये यांच्यासारखे हाडाचे शिक्षक आव्हानांना छेदून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत असतात. असे निरोप समारंभ कार्यक्रमाता उपस्थित शिक्षकांनी सांगितले. शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. अखंड ज्ञानावर शिक्षकांची श्रद्धा असते. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतांना वयोमानामुळे निवृत्ती मिळाली तरीही आपल्या अनुभवांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नेहमी करत राहील असे विजय उपाध्ये यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे चिटणीस उत्तमराव मांडे, कार्यालयीन सचिव देवेंद्र भोसले, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, एनडीएसटी अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे शिक्षणाधिकारी मोहन चकोर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी धामणीचे सरपंच नारायण भोसले, गौतम भोसले, माजी सैनिक मनोहर भोसले, पांडुरंग भोसले, भाऊसाहेब भोसले, अशोक भोसले उपस्थित होते.शिक्षक श्यामकांत धामणे, दादासाहेब आहेर, मधुकर पवार, शिवाजी काळे, एस. झेड. गाढवे, एस. ए. गुजर, आर. बी. गुजर, जी. पी. जाधव, एस. ई. परदेशी, आर. एस. धामणे, डी. डी. भोसले, व्ही. व्ही. घोटेकर, व्ही. बी. बऱ्हे, शिवनाथ लाड, व्ही. एन. वाकचौरे, ए. बी. मुटकुळे आदींसह आजी-माजी विद्यार्थी, धामणी, पिंपळगाव मोर, बेलगांव तऱ्हाळे येथील ग्रामस्थांसह नातेवाईक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!