मोटरसायकल अपघातात वाडीवऱ्हेचे २ युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे फाटा आता नव्याने अपघातांचे केंद्रबिंदू ठरतंय. मध्यरात्री झालेला अल्टोचा अपघात ताजा असतांनाच आज रात्री 8 वाजता मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल वाहनाने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये वैभव दत्तू मुकणे वय 20, संतोष सोमा हिरवे वय 18 दोघे रा. वाडीवऱ्हे हे युवक गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकल क्रमांक MH 15 BP 1439 घेऊन हे दोघे गोंदेच्या दिशेने जात होते. मात्र मुंबईच्या दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हल क्रमांक MH 15 GV 3015 ने त्यांना धडक दिली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!