नाशिकचा बालकवी पियुष गांगुर्डे याने कोरोना जनजागरण करण्यासाठी केलेली उत्स्फूर्त कविता
आली आली
कोरोनाची साथ
कोरोना पोहचला
घराघरात
नका खाऊ
शिळे व उघड्यावरचे
घ्या डॉक्टरचा सल्ला
आणि खा आपल्या घरचे
कोणाशी बोलतांना फिरतांना
ठेवा तोंडावर रुमाल
नाहीतर सहन करावे लागतील
कोरोनाचे हाल
हात पाय किमान धूवा
दिवसातून दोन वेळा
घराबाहेर पडणे टाळा
तरच बसेल कोरोनाला आळा
ह्या युगात द्या
स्वच्छतेला विशेष महत्व
कोठेही लक्षात ठेवा
हे जीवनाचे तत्व
( बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे हा इयत्ता ७ वी मध्ये जनता विद्यालय, पवननगर, नाशिक ह्या शाळेत शिकतो. )