इगतपुरीनामा न्यूज – क्रांतिवीर भगत सिंग शहीद दिनानिमित्त वीरनारी वीरमाता बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रहार सैनिक कल्याण संघातर्फे शौर्य सन्मान व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण सोहळा २३ मार्चला सायंकाळी ४ वाजता पाथर्डीफाटा येथील महाराजा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शूरवीरांच्या परिवाराचा सन्मान आणि गुणवंतांना इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे यांनी केले आहे. पुरस्कारात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, डॉ. विश्वनाथ खतेले, झहीर आ सत्तार देशमुख, विकास काजळे, आर्मी विशाल वाकचौरे, भास्कर मते, शहीद परिवारासाठी मोफत चहा नाश्त्याची सेवा देणार्या हॉटेल शिवभोलेच्या संचालिका आश्विनी धोंगडे, कमलाकर सांबरे, राजू देवळेकर, विजय सुरुडे, देविदास महाराज वारुंगसे, अजय तावरे आदींची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयहिंद जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत, उमा कुलकर्णी, ज्योती पेंडसे, शेतकरी नेते संदीप पागेरे, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष नारायण जाधव, सुनील महाराज गाडेकर, कारगिल योद्धा कॅ. प्रदीप पटनायक, समाज विकास फाउंडेशनचे सचिव विष्णू वारुंगसे, भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष विजय पवार, गिरीश पाटील, वीरमाता ज्योती राणे, मिनल मोदी, स्नेहा हरमळकर, पिसारनाथ कामत, सुनील जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group