माणिकखांब – आईवडील जन्मत: मुकबधिर पण मुलीने काढले नशीब : दहावीच्या परीक्षेत मिळवले ९१.६० टक्के

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इगतपुरी तालुक्यातल्या माणिकखांब गावातील जन्मत: मूकबधिर असणाऱ्या कुटुंबातील मुलीने दहावीच्या परीक्षेत अव्वल कामगिरी केली आहे. आईवडिलांची साथ आणि आशीर्वाद सोडून अन्य काहीही पदरात नसतांना तिने मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे. शाळा, अभ्यास आणि घरकाम यामध्ये रमूनही तिने गाठवलेले यश इगतपुरी आणि नाशिकला अभिनंदनिय झाले आहे. माणिकखांब येथील मुळ रहिवासी असणाऱ्या मात्र नोकरीनिमित्त नाशकात वास्तव्याला असणाऱ्या चव्हाण कुटुंबातील श्वेताच्या यशाने मूकबधिर आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत आहेत.

कु. श्वेता गोरक्षनाथ चव्हाण हिने दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के एवढे गुण मिळवून अव्वल दर्जा राखला आहे. तिचे वडील गोरक्षनाथ रामदास चव्हाण ही जन्मतः मुकबधीर असून आई दीपाली गोरक्षनाथ चव्हाण ही सुद्धा जन्मतः मुकबधीर आहे. मुलगी श्वेता हिने दहावी बोर्डात दर्जेदार गुण मिळवल्याने आईवडिलांनी नि:शब्द मार्गाने रडत रडत तिचे अभिनंदन केले. कुटुंब मुकबधिर असले तरी श्वेताला मात्र बोलता येते. पंचवटीतील तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय येथे 1 ली ते 10 पर्यंत तिने शिक्षण घेतले. वडील नाशिक मनपा आरोग्य विभागात मुकादम आहेत, आई गृहिणी आहे. एकुलती एक असणारी लेक श्वेता लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. शाळेत सुद्धा ती शिक्षकांची लाडकी आहे. घरात ती आईला कामात मदत करते. तिच्या यशाचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मनसे नेते दीपक चव्हाण यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!