कावनई सोसायटीत शेतकरी विकास पॅनलकडे सर्व जागा बिनविरोध

किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

कावनई विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने सर्व 11 जागांवर विजय मिळविला आहे. परिवर्तन  पॅनलला एकही जागा मिळाली नाही. कावनई येथे विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. 11 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात होते. दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असतांना नवीन 222 मतदारांची भर पडल्याने चुरस वाढली होती.

मतदारांनी सत्ताधारी गटाकडे पुन्हा सोसायटीची सत्ता दिली. सत्ताधारी गटाचे नेतृत्व चेअरमन शिवाजी शिरसाठ, खंडेराव पाटील यांनी केले. शिवाजी शिरसाठ, सुनील शिरसाठ, संदीप शिरसाठ, नंदकुमार पाडेकर, रामभाऊ पाटील, खंडेराव पाटील, जगन पाटील, कलाबाई शिरसाठ, मुक्ताबाई शिरसाठ, संतोष दोंदे, राजाराम शेलार, लालचंद धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी पांडुरंग वाघचोरे, योगेश खरात, सुभाष आहेर, नंदू मुठाळ, मोहन गायकवाड, सचिव सदाशिव राऊत, अमोल डोळस, पोलीस हवालदार भास्कर शेळके, गोविंद सदगीर आदींनी काम पाहिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!