प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – तालुक्याच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजुला करून विकास कामांना व जनतेच्या हिताला प्राधान्यक्रम दिला जाईल. त्यासाठी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा मविप्रचे संचालक ॲड. संदिप गुळवे यांनी केले. मुकणे येथे व्यायाम शाळा साहित्य, स्मशानभुमी निवाराशेड, बचतगटाचे आदर्श ग्रामसंघ कार्यालय आदी कामांचे लोकार्पण व नवीन सभामंडप शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, भाऊसाहेब खातळे, कृउबा संचालक सुनील जाधव, शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, युवा नेते तुकाराम वारघडे, कृउबा संचालक अर्जुन भोर, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे किरण कातोरे, वैभव धांडे, माजी सभापती गणपत पाटील राव, माजी संचालक विष्णु पाटील राव, सोसायटी चेअरमन जगन राव, सरपंच हिरामण राव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
श्री.गुळवे यांनी यापुढेही आवश्यक कामांच्या सुचना दिल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. आमदार हिरामण खोसकर यांनी मुकणेसाठी कुठलाही निधी कमी पडु दिला जाणार नाही विकासकामांसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव यांनी सुचवलेली कामे आपण मार्गी लावू असे सांगितले. निवृत्ती जाधव, बाळकृष्ण शिरसाठ आदींचे भाषण झाले. यावेळी विभागीय कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकवल्याबद्दल एमपीजी विद्यालयातील विद्यार्थिनी चैताली खंडू वेल्हाळ, वसुंधरा पिंटू मुकणे यांना सन्मानचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव, सोसायटी चेअरमन काळु आवारी, संचालक गणेश राव, भानुदास बोराडे, गजीराम राव, मोहन बोराडे, ज्ञानेश्वर राव, गोकुळ राव, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, लहानु साबळे, पोपट वेल्हाळ, सुरेश आवारी, रुंजा खांदवे, सोमनाथ राव, सचिन बोराडे, कचरू राव, अनिल उबाळे, संजय बोराडे, अंकुश राव, काळु खांदवे, खंडू वेल्हाळ, अजय आवारी, अमोल बोराडे, विशाल बंदावणे, सुनील राव, किरण भवर, गणेश राव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रभाकर आवारी यांनी तर आभार ग्रामसेवक उमेश खैरनार यांनी मानले.