उत्तम गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गणतंत्र दिवस, संविधान गौरव दिनाचे औचित्य साधुन लुम्बिनी बुद्ध विहार फाऊंडेशन सिल्वासा- गुजरात येथे “शिव शाहू फुले आंबेडकर विचार विचारधारा व भारतीय संविधान”या विषयावर नाशिकचे भूमीपुत्र शिवव्याख्याते समाधान हेंगडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. संविधान निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने १८ दिवस कठीण परिश्रम आणि अध्ययन केल्यानंतर समता “स्वतंत्रता बंधुता आणि न्याय” यावर आधारित भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ साली तयार करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्द करण्यात आले. संविधान संसदेत बहुमताने पारित केल्यानंतर २६ जानेवारी १९५० साली अमलात आणले. याकरिता संविधान दिवस जनजागृती होण्यासंबंधाने शिवव्याख्याते समाधान हेंगडे पाटील यांचा लुम्बिनी बुद्ध विहार फाउंडेशन अंतर्गत मार्गदर्शन संबोधन प्रबोधनाचा कार्यक्रम आदिवासी भवन तोकरखडा सिलवासा गुजरात येथे उद्या २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक समाज सेविका सुषमा पाखरे या उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लुंबिनी बुध्द विहार फांऊडेशनचे अध्यक्ष प्रविण मेश्राम, उपाध्यक्ष सुदर्शन कांबळे, सचिव विजय पगारे, सल्लागार आनंद ढाले, खजिनदार महेंद्र साडवे तथा कमिटीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.