

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. पिंपळगाव मोर येथील कु. जया भिका पवार हिने आदर्श कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ९० टक्के गुण मिळवले आहेत. दैदिप्यमान यश संपादन करून ती शाळेत प्रथम आली आहे. जयाच्या यशाचे शाळेतील शिक्षकांनी कौतुक केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पिंपळगाव मोर सारख्या खेडे गावातून घोटी येथे शाळेत जाणाऱ्या जयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. ९० टक्के गुण मिळवणारी जया गावातील पहिलीच असून तिच्या यशाचा पंचक्रोशीत बोलबाला होतो आहे. जयाचा दहावीचा निकाल पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या यशाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.