माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यालय बंद होते. यामुळे यावर्षी वेळेत शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.  इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या पुस्तकांचे वाटप ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल गवई, बी. बी. आहेर, एकनाथ पवार, आगरी समाजाचे विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण, पालक समिती अध्यक्ष कृष्णा आडोळे आहेर भाऊसाहेब, कैलास मुसळे आदींच्या हस्ते झाले

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!