प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नवनाथ गायकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी सत्य पोलीस टाइम्सचे पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर यांची निवड झाली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी निवडीची घोषणा केली. श्री. गायकर यांनी यापुर्वी संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हाध्यक्ष त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना राज्यावर बढती देण्याचा संघाने निर्णय घेतला अशी माहिती आंबेगावे यांनी दिली.

नवनाथ अर्जुन पा. गायकर  सन १९९६ पासुन ते आजतागायत तब्बल पंचवीस वर्षापासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ते जेष्ठ पत्रकार असुन सर्वच दिग्गज वर्तमानपत्रात काम केल्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ते साहित्य परिषदचे संपादक असून प्रसिद्ध साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा या साहित्यिक संस्थेचे ते  जिल्हाध्यक्ष असून त्यांची विविध विषयावरील अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा शाखेची नाशिक जिल्ह्यात त्यांनी सर्वप्रथम स्थापना केली आहे. ह्या संघटनेचे ते १ ले संस्थापक जिल्हाध्यक्ष होते. सलग दोन वर्ष त्यांनी नाशिक जिल्ह्यात यशस्वीपणे काम पाहत संघटना नावारुपाला आणून संघटनेची मजबूत बांधणी केली. पत्रकाराच्यां विविध समस्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या भरीव कामाची दखल घेऊन त्यांना दिलेली उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुखाची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. संघटना बांधणीचे त्यांचे कौशल्य, धडाडी लक्षात घेऊन त्यांची संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात झाली.

त्यांच्या निवडीचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधा कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पगार, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, कार्याध्यक्ष रणजित मोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, लातूर जिल्हा अध्यक्ष लहू शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष ( शहर ) चंदन खतेले, नाशिक जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) बाबासाहेब गोसावी, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जैन, नंदुरबार जिल्हा संघटक हितेश पटेल, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, जळगाव जिल्हाध्यक्ष सतिश सोनवणे, आदीसह जितेंद्र साठे, विजय आव्हाड, मनोहर भावनाथ, देवचंद महाले, निशिकांत पाटिल, जयदीप भदाणे, कुबेर जाधव, काळु वाघ, युसुफ पठाण, दिलीप बोरसे, अनिल केदारे, युवराज वाघ, संतोष कांदे, सुनील पहाडिया, विशाल ठवळे, शाहबाज शेख, पांडुरंग दोंदे, सागर हांडे, गोरख बच्छाव, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, प्रशांत शिरोडे, नानासाहेब गांगुर्डे, रोहित ताराहबादकर, दिनेश गोसावी, सोमनाथ क्षत्रिय, तुकाराम रोकडे, सुनील गाढवे, जाहिद शेख, शांताराम भांगे, संदीप गंभीरे, त्र्यंबक जाधव, अमोल भवर, वैभव भांबर, इमरान अत्तार, रफिक पठाण, खलील शेख, इमरान शेख, निलेश काळे, मयुर पहाडिया, दिपक कानडे, सतीश पाटील, चंद्रकांत धात्रक, गौरव मांडे, भागवत गायकवाड आदीसह अनेक जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सभासद यांनी स्वागत केले आहे.

अल्पावधीतच आपल्या कामाची दखल घेत संघटनेने थेट राज्य पातळीवर आपली निवड करुन फार मोठा विश्वास आपल्यावर व्यक्त केला आहे. हा विश्वास नक्कीच सार्थ करु. सदैव संघटनेच्या हिताचेच काम करु अशी ग्वाही नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी बोलताना दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!