बलायदुरीत नवागत विद्यार्थ्यांचे टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढून जल्लोषात स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

बलायदुरी जिल्हा परिषद शाळेतील नवागत विद्यार्थी स्वागत सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. शालेय परिसर स्वच्छता, सडारांगोळी काढून वर्ग सुशोभिकरण, दारावर तोरण बांधून वर्ग परीसर सजविण्यात आला. सरस्वती पूजन सरपंच हिरामण दुभाषे, केंद्रप्रमुख योगेश भामरे यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक भिला अहिरे यांनी केले. नव्या विद्यार्थ्यांना रथामध्ये, घोड्यावर बसवून वारकरी दिडींने टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. गावातून मिरवणुकीने आल्यावर शाळेत मुलांचे पहिले पाऊल ठसे, पुस्तक, गणवेश वाटप करण्यात आले.

शाळा पूर्वतयारी दुसरा मेळावा स्टाॅलमध्ये मुलांसह पालकांना मार्गदर्शन करून प्रेरणा देण्यात आली. सरपंच हिरामण दुभाषे, माजी सरपंच मल्हारी गटखळ, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास भगत, वारकरी शिक्षण संस्था बलायदुरीचे हभप विजय महाराज चव्हाण,  केंद्रप्रमुख योगेश भामरे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना नाठे मनोहर भगत, अशोक पवार, अंगणवाडी कार्यकर्ती ऐश्वर्या गटखळ, दिपाली राक्षे, ग्रामस्थ काळू गटखळ, गंगाराम गटखळ, गजानन भगत, काशिनाथ गटखळ, सुनिल गटखळ, सत्यवान गटखळ, राक्षेबाबा, जालिंदर भगत, मंजुळा भगत विठाबाई भगत, लिलाबाई भगत, ग्रामसेविका आशा गोडसे, शिक्षक भिला अहिरे, सुनंदा अहिरे, सरला सोनवणे, कीर्तिबाला बागुल, प्रशांत भदाणे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!