भगतवाडी येथील ५० वर्ष जुना पाणीप्रश्न सुटला : उत्तम शिंदे, जगन कदम आणि फिरोज शेख यांचा पाठपुरावा यशस्वी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

भगतवाडी येथील 50 वर्षांपासून रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला आहे. उत्तम आप्पा शिंदे यांच्या सहकार्यासह जगन कदम, पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू आणि फिरोज शेख यांच्या प्रयत्नाने पाण्याचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पन्नास वर्षापासून ह्या वाडीकडे कुठल्याही पुढाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नव्हते. परंतु जगन कदम आणि फिरोज शेख यांनी हा विषय उत्तम आप्पा शिंदे यांच्याकडे मांडला. त्यांनी टचवूड फाऊंडेशन व लायन्स क्लबचे अध्यक्ष बच्छाव साहेब यांच्याशी संपर्क साधून सर्व गोष्टींचे पाठपुरावा केला.

भगतवाडीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बच्छाव साहेबांनी भगतवाडी शाळेची अवस्था बघितली असता शाळेचा छतावर पत्रे बसवण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनीही पिंपरी सद्रोद्दिन शाळेसाठी तीन वर्गखोल्या मंजूर करण्यात येतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी गोरख बोडके, नंदू शिरोळे, ज्ञानेश्वर भागडे, उपसरपंच शहनाज शेख, ग्रामपंचायत सदस्य  जयश्री उबाळे, ज्ञानेश्वर कदम, बबलू उबाळे, प्रकाश उबाळे, रमेश पाटेकर, ग्रामसेवक गुलाब साळवे, एकनाथ ठाकरे, राघो भगत, आसिफ शेख, मतीन पठाण, अमजद पटेल, बाबू ठाणगे, अय्याज पठाण व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!