मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंदराव सानप यांच्या उपस्थितीत आदर्श गाव मोडाळे येथे विविध कार्यक्रम : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप आणि कामांचे होणार लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उद्या सोमवारी इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे  विविध शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा आणि विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंदराव आनंदा सानप यांच्या हस्ते वाटप आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. कर्तव्यदक्ष न्यायमूर्ती गोविंदराव आनंद सानप हे सर्वच समाजासाठी त्यांच्या कर्तृत्वामुळे आदरणीय आहे. टाडा कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी रामशास्त्री बाण्याने न्यायदान केले असून नाशिकला असताना मालेगाव बॉम्बस्फोटासारख्या अनेक संवेदनशील केसेस त्यांच्यापुढे सुनावणीसाठी होत्या. सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त म्हणून चांगला विकास त्यांनी आपल्या कार्यकाळात केला. शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याने त्यांनी शेतकऱ्यांनाही खरा न्याय दिलेला आहे. न्या. सानप यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट निर्माते मुंबईचे उद्योजक गणपत कोठारी उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्सचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व पुस्तके वाटप, विद्यार्थ्यांना मोफत ३५० गणवेश, १०० सायकली, मोबाईल टॅब व मोफत बुटसेट वाटप, विद्यार्थिनींसाठी २ सॅनिटरी पॅड मशिन, शाळेसाठी १० संगणक संच, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर व वॉटर कुलर, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच आणि गावातील ग्रामस्थांना बसण्यासाठी १२ बाकांचे लोकार्पण आणि वाटप करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गोरख बोडके यांनी केले आहे. 

error: Content is protected !!