
इगतपुरीनामा न्यूज – एल्गार कष्टकरी संघटनेकडून शोषित, दलित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी संविधानिक मार्गाने काम सुरु आहे. राज्यातील कामगारांना न्याय मिळावा, कष्टकऱ्यांना त्यांचे संविधानाने दिलेले मूलभूत हक्क मिळावे यासाठी काम करणाऱ्या एल्गार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन उद्या कामगार दिनी वैतरणानगर होणार आहे. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शोषित व पीडितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम होईल. आदिवासी कष्टकरी यांना हे कार्यालय म्हणजे शक्ती स्थळ असेल. राज्यातील स्त्री-पुरुष, विद्यार्थी, आदिवासी, कष्टकरी यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी ही संघटना अहोरात्र झटत आहे. पुढील काळात संघटना मोठ्या प्रमाणात वाढावी, गरिबातल्या गरीब माणसाला संविधानाने दिलेले हक्क मिळावेत यासाठी या संघटनेच्या कार्यालयातून कामकाज सुरू राहील असे अध्यक्ष भगवान मधे यांनी सांगितले.