गोंदे जवळ मोटारसायकलला भरधाव ट्रकने ठोकल्याने म्हसुर्ली येथील पतिपत्नी गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे वाचले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

मुंबई आग्रा महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. गोंदे दुमाला भागातील रेमंड कंपनीजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून ठोकर दिल्याने आज अपघात झाला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमाराला घडली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली येथील पतिपत्नी गंभीर जखमी झाले आहेत. गोंदे फाटा येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
अर्जुन अंकुश रण वय २५ हा युवक पत्नी मीना अर्जुन रण वय २१ दोघे राहणार म्हसुर्ली हे घोटीच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. यावेळी भरधाव ट्रक क्रमांक MH 04 JK 3599 याने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघेही पतिपत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करून पळून जाणाऱ्या ट्रकला पाडळी देशमुख येथे गाठून ताब्यात घेण्यात आले. ट्रकचालकाचे नाव विनोदकुमार यादव असे आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!