इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
रेल्वे प्रवासात चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करणाऱ्या २ संशयितांना इगतपुरी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद केल्याने मोक्षदा पाटील IPS लोहमार्ग औरंगाबाद यांनी कौतुक केले आहे. ह्या घटनेत नाशिकरोड परिसरातील २ संशयित युवकांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी आकाश शंकर जाधव वय २६ वर्ष रा. कन्नमवार नगर- २ विक्रोळी इस्ट बिल्डींग न. १ आई दुर्गेश्वरी रूम नं. २ हे सोमवारी दुपारी नागपुर मुंबई विशेष गाडीचे पाठीमागील जनरल बोगीतुन धामणगांव ते मुंबई असा प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान त्यांना इगतपुरी रेल्वे स्टेशन येण्याच्या आधी जाग आली असता आरोपी विक्रम किष्णा अहिरे वय २५ रा. जेतवंत नगर, जय भवानी रोड नासिक, राहुल सुरेश सोमवंशी वय २३ वर्ष रा. देवळाली गांव सुंदर नगर नासिक यांनी संगनमत करून त्यांना चाकुचा धाक दाखवला. त्यांच्या शर्टाच्या खिशातुन रोख १ हजार रूपये हात घालुन जबरीने हिसकावुन घेतले. याबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यांने गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाबाबत
मोक्षदा पाटील IPS लोहमार्ग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. भाले, पोहवा रमेश भालेराव, विलास जाधव, योगेश पाटील, प्रमोद आहके यांनी तातडीने काही तासातच आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला. ह्या आरोपींना पकडुन त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेला चाकु, दोनशे रूपये रोख जप्त करण्यात आले. आरोपींना आज मनमाड रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे करीत आहे.