जननायक गोरख बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील २० गावांना प्रत्येकी १० लाखांप्रमाणे २ कोटींचा निधी – ना. धनंजय मुंढे : गोरख बोडके यांचा वाढदिवस इगतपुरीसह जिल्हाभरात धुमधडाक्यात साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सातत्याने जनसेवा आणि ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेले जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्यासारखे मित्र लाभल्याचा आनंद होतो. ज्यांचे स्थान जनतेच्या हृदयात आहे असे ते सुप्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील २० गावांसाठी प्रत्येकी १० लाख असे २ कोटी रुपये किमतीची विकासकामे देण्याचे आदेश दिले आहेत. गोरख बोडके यांच्या जन्मदिवसाच्या मंगल पर्वावर ह्या विकासकामांची सप्रेम भेट देत आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंढे यांनी केले. मुंबई येथे गोरख बोडके यांच्यासाठी आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ना. मुंढे यांनी तातडीने २ कोटींच्या कामांचे आदेश पारित केले. इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत प्रत्येक जनमानसात गोरख बोडके यांनी उभे केलेले काम उल्लेखनीय असून त्यांना जननायक ही दिलेली पदवी सार्थ आहे. गोरखभाऊ तुम्ही शतायुषी होऊन रंजल्या गांजलेल्या नागरिकांसाठी अभूतपूर्व कार्य करा अशा शुभेच्छाही ना. धनंजय मुंढे यांनी यावेळी दिल्या.

ही आहेत १० गावांतील कामे

जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्याने इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन सोहळे जोरदार संपन्न झाले. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते. दुपार नंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी गोरख बोडके यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी त्यांनी श्री. बोडके यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी इगतपुरी तालुक्यातील २० गावासाठी प्रत्येकी 10 लाख असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी दलित वस्तीसाठी मंजूर करण्यात आला. ना. धनंजय मुंढे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले. लवकरच इगतपुरी तालुक्यातील या २० गावांमध्ये दलित वस्तीचे काम सुरू होणार आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी ना. धनंजय मुंढे यांचे यावेळी आभार मानले. या कामासाठी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, डॉ. सुधाकर जगताप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.

लोकांच्या कामातून मिळालेल्या आशीर्वादामुळे माझा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो. जनतेने दिलेले प्रेम, सदिच्छा यांच्यासाठी मी सातत्याने धावत असतो. इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असा परिपूर्ण विकास घडवण्याचे माझे स्वप्न आहे. ना. धनंजय मुंढे यांनी माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने २ कोटींचे दिलेले काम ही माझ्यासाठी चिरंतन आठवण आहे. मुंढे साहेबांची तालुक्यातर्फे कृतज्ञता व्यक्त करतो.
- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!