इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
शिवसेनेचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असतांना त्यांचे इगतपुरीचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या घाटनदेवी येथे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या दोऱ्यात इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधत येथील पाणी प्रश्न जाणून घेतला. यावेळी शिदवाडी येथील महिलांनी गावातील समस्यांबाबात चर्चा केली असून ना ठाकरे यांनी तात्काळ येथील पाणी प्रश्न बाबत सक्त सूचना देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या चर्चेत खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान खंबाळे ग्रामपंचायतील तलाव सुशोभिकरणासाठी देखील भरीव निधी देण्यात आला असून या तलावाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी येथील एक कोटी ९२ लाखांच्या पाणीपुरवठा योजने बाबत नागरिकांशी पर्यटनमंत्री ना आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी खंबाळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच द्वारकाताई कैलास शिद, उपसरपंच दिलीप चौधरी, ग्रामविकास अधिकारी डी. बी. घडवजे आदींनी देखील चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी धरणांच्या तालुक्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत असतात. मात्र शाश्वत पाणीपुरवठा योजना कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आज प्रत्यक्षात ना आदित्य ठाकरे साहेब यांनी शिदवाडी येथील पाणी प्रश्न संदर्भात महिला नागरिकांशी संवाद साधला त्यामुळे येथील पाणी प्रश्न कायमचा मिटेल असा आशावाद माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केला. तर माजी आमदार निर्मला गावित यांनी बोलतांना सांगितले की, खंबाळे शिदवाडी येथील पाणी प्रश्नाबाबत आम्ही पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबत चर्चा केली होती. त्यावेळी ना ठाकरे साहेब यांनी सकरात्मक भूमिका घेत येथील पाणी प्रश्न लवकर सुटेल असे आश्वासन दिले त्यामुळे आज प्रत्यक्षात त्यांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळे येथील पाणी प्रश्न नक्कीच सुटेल अशी आशा या प्रसंगी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना सपर्क प्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, सुनील बागुल, जिल्हा प्रमुख विजय आप्पा करंजकर, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग बरोरा, नगरसेवक विलास शिंदे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, ज्येष्ठ नेते रमेश गावित, माजी सभापती विठ्ठल लंगडे, कावजी ठाकरे, रघुनाथ तोकडे, कचरू डुकरे, साहेबराव धोगडे, नंदलाल भागडे, सुर्यकांत भागडे, रामदास भोर, संजय आरोटे, हिरामण कडु, गणेश काळे, नगरसेविका उज्वला जगदाळे, मथुरा जाधव, अलका चौधरी, नगरसेवक उमेश कस्तुरे, प्रांत तेजस चव्हाण, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक वसंत पथवे आदी उपस्थित होते.