रायगडनगर येथे पिकअपच्या अपघातात दोन जखमी : नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींचा वाचला

 इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

मुंबई आग्रा महामार्गावर आज पहाटे रायगडनगर जवळ नासिकच्या दिशेने येणाऱ्या MH 01. DR 0879 ह्या क्रमांकाच्या पिकअपने पुढच्या अज्ञात गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेला चालक व त्याचा सहकारी एक तास अडकुन पडले. तासाभराने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. या  अपघाताची माहिती फोनवर मिळताच अहोरात्र २४ तास सेवेत उभ्या असलेली जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी मदन भुगी प्रजापती वय 32, प्रभु जनक रॉय प्रजापती वय 26 रा. यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे पुनश्च जीवदान मिळाले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!