इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
किशोरावस्थेतील मुलामुलींनी पालकांची सुसंवाद वाढवला तर त्यांच्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक, समस्या सुटतील. यामुळे कोणीही किशोरवयात वाममार्गाला जाणार नाही. वेगाने होणाऱ्या बदलामुळे मुले अस्वस्थ, गोंधळलेले असतात, चिडचिडेपणा करतात. अशा विविध समस्या त्या माध्यमातून सुटू शकतील असे प्रतिपादन मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक महेश पाडेकर यांनी केले. लोकपंचायत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने घारगाव येथे आयटीआय महाविद्यालय आयोजित उन्हाळी शिबिरात उद्बोधन वर्ग सुरू आहे. त्यात विविध विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कुमारावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था यातील १० ते २० वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण, वयात येताना होणारे बदल, मुला मुली कडून होणाऱ्या चुका, लैंगिक अत्याचार, जाळ्यात अडकणे आदी विविध समस्या निर्माण होत असतात. त्या निर्माण होऊन नये, त्याचे योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी लोकपंचायत ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त हनुमंत उबाळे यांनी मानसशास्त्र विषयावर वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या व उपाय त्यातून व्यक्तिमत्व विकास यावर व्याख्यान आयोजित केले. समर कॅम्पसाठी 10 ते 20 वर्ष वयोगटातील १०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे चांगले व्यक्तिमत्व घडवावे या हेतूने लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण करकुंडी, घारगाव येथे समरकॅम्प आयोजित केला होता. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त हनुमंत उबाळे, तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे उपप्राचार्य हासे, सुशील सावंत, बंदावणे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते