राहुल बोरसे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभा यांच्यासहा माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानातंर्गत ८५१ शिधापत्रिकांचे मोफत वाटप करण्यात आले.
तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभा यांच्या मागणीच्या संयुक्त विद्यमाने ठाणापाडा येथे हरसूल भागातील प्राधान्यक्रम असलेले, तसेच अंत्योदय अशा १३०० शिधापत्रिकांच्या मागणीनुसार ८५१ लाभार्थ्यांना तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी किरण जाधव, जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे, हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, माजी सभापती ज्योती राऊत, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. शिरोळे, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी आदींच्या हस्ते शिधापत्रिका वाटण्यात आल्या. कोरोना काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शिधापत्रिकांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले की, १३०० मागणी अर्जापैकी जुलै महिन्याच्या अखेर उर्वरित शिधा पत्रिका वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानांतील धान्य अन्य कुठे काळ्या बाजारात जात असेल तर देणारा आणि घेणाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभा आणि माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या मागणीच्या संयुक्त विद्यमाने मोफत वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांत अतिदुर्गम भागातील लाभार्थ्यांना या महाराजस्व अभियांनाचा पुरेपूर फायदा झाल्याने खऱ्या अर्थाने ही योजना तळागाळातील गरजू पर्यन्त पोहचली आहे. याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जयवंत राऊत, पुंडलिक महाले, नामदेव पागी, राजू गोतरणे, किरण ढोले, पंडित गावित, दिलीप भोये, यादव पवार, भाऊराम किरकिरे, चंदर चौधरी, परशराम खरपडे, सुरेश थोरात, मजहर शेख, जिना दाहवाड, रामदास चौधरी आदींसह पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
नुकत्याच हरसूल येथील माकपच्या मोर्चात शिधापत्रिकांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्या मागणीनुसार तसेच शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या माध्यमातून हरसूल, ठाणापाडा सारख्या अतिदुर्गम भागातील लाभार्थ्यांना जवळपास १५ हजाराहून अधिक आजपर्यंत शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. १३०० मागणी अर्जापैकी ८५१ लाभार्थ्यांना मोफत वाटप केले असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप करण्यात येईल.
- इरफान शेख, माकप जिल्हा सचिव