कामावर घेण्याच्या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार कामगार कृती समितीकडून आमरण उपोषण सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

गोंदे दुमाला येथील Husqvarna Group ह्या कंपनीमध्ये गावातील स्थानिक सुशिक्षीत बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे या मागणीसाठी भूमिपुत्र बेरोजगारांनी ९ मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे अशी माहिती सुशिक्षीत बेरोजगार कामगार कृती समिती गोंदे दुमाला यांच्या वतीने देण्यात आली. गोंदे दुमाला क्षेत्रातील जमिनी विविध कारणासाठी राखीव असल्याने अनेक शेतकरी अल्पभुधारक तर काही भूमिहीन झाले आहे. आता उपजीवीकेचे कोणतेही साधन राहिले नाही. सर्व स्थानिक नागरिक उपजिविकेसाठी  कारखान्याच्या रोजगारावर अवलंबून आहे.

कंपनी व्यवस्थापनाला बेरोजगार कृती समिती व ग्रामपंचायत गोंदे दुमाला यांनी वारंवार निवेदने देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी बेरोजगार कृती समिती व ग्रामपंचायत गोंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांना कामावर घेऊ असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले. पण नंतर 6 महीने उलटुन गेले असतानाही व्यवस्थापनाने कोणतीही दखल न घेता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सर्व बेरोजगार पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सदर कंपनीने लवकरात लवकर स्थानिकांना कामावर घ्यावे. ह्याची दखल कंपनी व्यवस्थापनाने घेतली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा बेरोजगार कृती समिती, ग्रामपंचायत गोंदे व ग्रामस्थांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!