इगतपुरीनामा न्यूज – टिळकांनी गणेशोत्सव सण समाज जागृतीसाठी असून ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले. आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बारवकर बोलत होते. गणेश मंडळांनी वादग्रस्त देखावे सादर करू नये, डिजेला बंदी असून मिरवणूक मार्गात व विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वालदेवीसह सर्वच धरणावर गणपती विसर्जनाला बंदी करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. याप्रसंगी दारणा धरणाचे शाखा अभियंता युवराज महाले, मुकणे धरणाचे विजय ठाकूर, वालदेवीचे एच. एच. दीक्षित, पोलीस नाईक प्रवीण काकड, कार्यक्षेत्रातील विविध गावातील गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group