आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पांढुर्ली ते साकुर ३३ केव्ही लाईनचे उदघाटन : शेतकरी आणि व्यावसायिकांचे प्रश्न सोडवल्याबद्दल नारायण भोसले यांनी मानले आभार

इगतपुरीनामा न्यूज – आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून पांढुर्ली ते साकुरफाटा सबस्टेशन ३३ केव्ही लाईनचे उदघाटन झाले. याचा फायदा शेतकरी व्यापारी, लघु उद्योगांना होणार असल्याने सर्वांनी आमदार कोकाटे यांचे आभार मानले. साकुर सबस्टेशनची वीज सातपूरहुन ५० किमी अंतर असलेल्या लष्कर हद्दीतून येत होती. त्यामध्ये वादळी वाऱ्याने  कायमच बिघाड होत असल्याने दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची. कमी दाबामुळे अनेक दिवस वीज गायब असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत होते. ह्या भागातील नागरिक, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा आकस्मिक एसीएफ निधी अंतर्गत सबस्टेशनसाठी १ कोटी ५२ लक्ष निधी मंजूर झाला. ह्या लाईनमुळे सिन्नर नपा पाणी योजनेसह टाकेद भागात १६ गावातील २९००, व्यापारी ३४०,  घरगुती २९५० अशा एकूण ६१९० ग्राहकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा होईल. शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याचे फळ मिळाले असून सबस्टेशनमुळे उद्योग धंद्यांना चालना मिळेल. भेडसावणाऱ्या विजेचा प्रश्न सर्वांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागणे शक्य झाल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. जनावरांना मुबलक पाणी नव्हते. एसएमबीटी रुग्णालयात सुद्धा विजेच्या प्रश्नामुळे समस्या उद्भवल्या होत्या. सुरळीत वीज पुरवठ्यामुळे साकुरफाट्यावरील सर्व व्यावसायिकांचे प्रश्न सुटणार आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्वांचे प्रश्न सोडवल्याबद्दल यांचे मनापासून आभार.
- नारायण भोसले, इगतपुरी तालुकाध्यक्ष स्वराज्य संघटना

याप्रसंगी सिन्नरचे उपकार्यकारी अभियंता सचिन पवार, इगतपुरीचे मंगेश प्रजापती, पांढुर्लीचे सहाय्यक अभियंता दीपक मोगल, साकुरफाट्याचे अमित धोरण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रतन पाटील जाधव, नामदेवर वाकचौरे, स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा नेते महेश गाढवे, बाजार समिती सभापती अनिल शेळके, विंचूर दळवीचे सरपंच बाळासाहेब भोर, सावतानगरचे सरपंच रमेश सकट, अंबादास भुजबळ, राजाभाऊ तुपे, शिवडेचे सरपंच प्रभाकर हारक, पांढुर्लीचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे, स्वीय सहाय्यक संजय डावरे, सरपंच देविदास देवगिरे, अरुण घोरपडे, सुनील वाजे, केरु दादा खतेले, रमेश देवगिरे, सागर टोचे, रामदास कवटे, देवराम खेताडे, संतोष बोडके, शिवाजी खेताडे आदी उपस्थित होते. सबस्टेशनच्या कामकाजाबाबत त्रिमूर्ती इलेक्ट्रिकल अँड एंटरप्राइजेसचे प्रवीण भवर, नवनाथ घुले, आकृद भवर, दिनेश भवर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!