हिंदूहृदयसम्राट ठाकरे यांच्या आशीर्वादाने खेड गटात जनसेवा करण्यासाठी सदैव तत्पर – खंडेराव शिवराम झनकर : बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या विचारातून कार्य करीत आहे. भविष्यामध्ये राजकीय माध्यमातून सेवेचे कार्य करणार आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवून समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. सरसेनापती बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांना वंदन करतो असे प्रतिपादन शिवसेना, संस्थापक राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे खंडेराव शिवराम झनकर यांनी केले. खेड येथील परदेशवाडी शासकीय आश्रम शाळेत हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी झाली. ह्यावेळी त्यांनी अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त केले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, उदय सांगळे यांच्या आदेशाने खेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना, संस्थापक राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान खंडेराव शिवराम झनकर हे होते. कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, अक्षय खाडे, गटप्रमुख साहेबराव झनकर, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, पंचायत समिती माजी सभापती रंगनाथ कचरे, ज्येष्ठ शिवसैनिक बहिरू केवारे, भास्कर वाजे, युवासेना उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वाजे, गणप्रमुख शिवाजी काळे, उपसरपंच पोपटराव लहामगे, कैलास गाढवे, सुदाम भोसले, शरद जाधव, सरपंच शिवाजी गाढवे, हेमंत झनकर, संपत गोपाळ वाजे, दीपक वाजे, संघटक राधकिसन झनकर, शिवव्याख्याते विकास शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून खेड गटात विकासात्मक कामे उभी करण्यासाठी बांधील असल्याचे खंडेराव झनकर शेवटी म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!