निर्मला गावित यांच्यातर्फे २५ ग्रामपंचायतींना सुसज्ज ग्रंथालय साहित्य वाटप संपन्न

वाल्मिक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

जो वाचील तोच आता वाचेल असा काळ आता सुरु आहे. वाचनाने चांगला नागरिक घडतो. म्हणुन हा ग्रंथालय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे या संस्थेने आदिवासी भागातील ग्रामपंचायतीना ग्रंथालय साहित्य वाटप करून आदिवासींच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पेगलवाडी येथे २५ ग्रामपंचायतीना ग्रंथालय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि महिलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील १०१ ठिकाणी सुसज्ज वाचनालय देण्याचे घोषित केले होते. ह्या संकल्पनेनुसार पहिल्या टप्प्यात २५ ग्रामपंचायतींना पेगलवाडी येथे सर्व प्रकारच्या पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्च्या आदी साहित्य वितरण करण्यात आले. मुंबई येथील सहाय्यम संस्था अध्यक्ष प्रदीप हिंगड, सचिव ॲड. संदीप पाटील यांच्या साहाय्याने हा उपक्रम संपन्न झाला. पेगलवाडी येथे ज्ञान अमृत प्रकल्पाअंतर्गत ह्या कार्यक्रमात २५ ग्रामपंचायतींना खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व माजी आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार निर्मला गावित, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, मा. जि. प. सदस्या नयना गावित, जेष्ठ नेते रमेश गावित, तालुकाप्रमुख संपत चव्हाण, माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे, तालुका समन्वयक समाधान बोडके, उपतालुकाप्रमुख शिवाजी कसबे, युवासेना उपजिल्हाध्यक्ष रामनाथ बोडके, सहाय्यम संस्था अध्यक्ष प्रदीप हिंगड, सचिव ॲड. संदीप पाटील, भाविक कोठारी, अनिकेत जैन, लींकेश जैन, जतीन जैन, माजी सभापती सोमनाथ जोशी, विवेक मिश्रा, देविदास जाधव, मनसे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, कचरू पा. डुकरे, मच्छींद्र दोंदे, ज्ञानेश्वर महाले, भुषण अडसरे, सरपंच शरद सोनवणे, तानाजी फड, भाऊसाहेब झोंबाड, रावसाहेब कोठुळे, पांडुरंग आचारी, ग्रामसेवक सारिका बैरागी, मथुरा जाधव, माधुरी आचारी, मंगल आचारी, माधुरी आचारी, संपत गुंड, शंकर भोईर, रमेश आचारी, दिगंबर आचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय कर्डक यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!