रायांबे येथील आंतरजातीय विवाहप्रकरणी ठाकर समाजाची कोणतीही हरकत नसल्याचा निर्णय : माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व पांडुबाबा पारधी यांच्या मध्यस्थीने वाद संपल्याचे घोषित

वाल्मिक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यातील रायांबे येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुलीने ५ मे रोजी आंतरजातीय विवाह केल्यामुळे जात पंचायतीने त्यांना अनुसुचित जमातीच्या सवलती बंद केल्यासंदर्भातचे पत्र पसरले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली रायांबे येथील समस्त आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पत्रकाव्दारे माहिती देण्यात आली की, दि. ५ मे रोजी प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झालेले पत्र गैरसमजुतीतुन लिहिले असल्याची माहिती देण्यात आली.

सोनाली एकनाथ कातवारे व मच्छिंद्र साहेबराव दोंदे या दांपत्याने केलेल्या विवाहाला आमच्या समाजाची काहीही हरकत नाही. सहमतीने केलेल्या विवाहाला कोणत्याही प्रकारचा विरोध करण्यात आलेला नाही. या दांपत्याला सर्वोतोपरी मदत करण्याची भुमिका आम्ही सर्व ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी घेतलेली आहे. यात घटनात्मक उल्लघंन होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यात संविधानीक अधिकाराचे ऊल्लंघन होणार नाही. त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधामधे कोणतीही बाधा आणणार नाही असा एकमताने निर्णय झाला. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुबाबा पारधी, सरपंच शिवाजी पिंगळे,  कृष्णा गोहीरे, कावजी भले, भाऊराव सोंगाळ, भगवान भगत, प्रकाश पोकळे, लालचंद भले, ऊत्तम वाक, रामजी आघाण, प्रकाश पिंगळे, सुनंदा पिंगळे, अँड. मारूती आघान, राजु गांगड आदि उपस्थित होते.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जात पंचायत हा विषयच राहिला नाही. ठाकूर समाजात कुठल्याही प्रकारे जात पंचायत होत नाही. समाजात अनेक तरुण सुशिक्षित असून नवदांपत्याला सर्वतोपरी समाज मदत करण्यास तयार आहे. कुठलाही जातीय तिढा निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे. शासनाच्या धोरणानुसार त्यांना कुठल्याही योजनांपासून वंचीत ठेवले नाही. कुठल्याही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये.
- काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!