इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अपघातांची संख्या रोजच वाढत असून नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. अपघातांची मालिका सुरूच असून आज रात्री साडेआठच्या सुमाराला भरधाव धावणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिली आहे. ह्या घटनेत मूळचा मध्य प्रदेशातील असणारा मात्र रोजगारासाठी पाडळी देशमुख भागात आलेल्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त व्यक्तीला जखमी अवस्थेत नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. कल्याण घनश्याम सोलंकी वय 42 असे मयताचे नाव असून तो मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी देशमुख फाट्याजवळ रस्ता ओलांडत होता.अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून जोरदार धडक देऊन वाहन वाहन पसार झाले. वाढत्या अपघातांमुळे इगतपुरी तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे.