पनवेलच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ; आगरी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

वाल्मिक गवांदे । इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

नवी मुंबई पनवेल येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तेथील स्थानिक भुमिपुत्रांच्या जमिनी शासनाने मोठ्या प्रमाणात संपादित केल्या. यामुळे स्थानिक लोकनेते दि. बा. पाटील यांचे सामाजिक योगदान पाहता या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. इगतपुरी तालुका व नाशिक जिल्हा आगरी सेनेने या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. त्यासाठी आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणपतराव कडु यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तहसील कार्यालया बाहेर मानवी साखळी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना सविस्तर मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आगरी सेनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

कोवीड महामारीमुळे शासन आदेशाचे पालन करून हे आंदोलन करण्यात आल्याचे आगरी सेना आंदोलकांनी सांगितले. यावेळी आगरी सेनेचे जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, सुरेश गणपत कडु, आगरी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश कडु, जिल्हा संपर्कप्रमुख लालु दुभाषे, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत डावखर, तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे, युवा आगरी सेना जिल्हाध्यक्ष अरूण भागडे, निलेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोपे, मदन लहाने आदींसह जिल्हा व इगतपुरी तालुका आगरी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
                          

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!