आमची एकात्मता कोणीच तोडू शकणार नाही : घोटीत हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी मनसे, पोलीस आणि मस्जिद ट्रस्टचा आदर्श समन्वय

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, घोटी पोलीस व दोन्ही मस्जिद ट्रस्टच्या वतीने सर्वांना आदर्श दाखवणारी घटना घडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन मुस्लिम बांधवांनी पहाटेची अजाण बंद केली. उर्वरित अजाण देतांना प्रार्थनास्थळाच्या आत भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. देशभरात अनेक जातीयवादी दंगे यापूर्वी झाले. मात्र घोटी शहराने कायम हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. आजच्या घटनेमुळे घोटी शहरात सामाजिक एकात्मता चांगली रुजली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याचा सर्वांनी आदर्श घेणे आवश्यक आहे.

यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जामा मजिदचे ट्रस्टी डॉ.युनूस रंगरेज,शाही मजिदचे ट्रस्टी मुस्ताक पानसरे यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.मनसेचे प्रताप जाखेरे ,घोटी शहराध्यक्ष निलेश जोशी,मनोज गोवर्धने राजेश राखेचा,अर्जुन कर्पे, ऋषी शिंगाडे,निलेश बुधवारे, शुभम भगत,अमोल क्षीरसागर उपस्थित होते. घोटी पोलीस आणि मनसे यांच्या समन्वयाने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाल्याने इगतपुरी तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील पदाधिकारी राज जावरे यांच्या सह सहा ते सात कार्यकर्त्यांना  ताब्यात घेण्यात येऊन 149 ची नोटीस बजावून सोडून देण्यात आले. इगतपुरीत ही मुस्लिम बांधवानी आज सामाजिक एकोपा जपत भोंग्यावरून कुठल्याही प्रकारची अजान पढली नाही

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!