
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्धीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गु.र.नं. 324/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4),118 (1), 3 (5) प्रमाणे दाखल असलेल्या ह्या गुन्ह्याची वाडीवऱ्हे पोलिसांकडून उकल करण्यात आली आहे. त्यानुसार तपासात ३ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा दशरथ दिवटे, वय- 21, विकास गणपत डगळे वय 20, रोहन केरु रौदळ, वय19 सर्व रा. लहांगेवाडी ता. इगतपुरी, जि. नाशिक ह्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ह्या आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेले वाहन वाडीवऱ्हे पोलिसांनी हस्तगत केले आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कंखरे, हवालदार शिरीष गांगुर्डे, प्रवीण काकड, हेमंत तूपलोंढे, उल्हास धोंडगे यांनी ही कामगिरी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी ह्या कामगिरीबद्धल वाडीवऱ्हे पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.