मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिकची महिला गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल वरून अचानक महिला पडल्याने अपघात झाला. ह्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघाताची माहिती मिळताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातग्रस्त महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामुळे तिचे प्राण वाचले.

मुंबई आग्रा महामार्गावरून वाडीवऱ्हे जवळ शेवाळ विहीर भागात अतुल भास्कर पाटेकर वय ४०, वंदना अतुल पाटेकर वय ३५ रा. कुंभारवाडा जुने नाशिक हे दोघे MH 15 BU 9556 ह्या हिरो मोटारसायकलने नाशिकला चालले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक वंदना अतुल पाटेकर ही महिला धावत्या मोटारसायकल वरून पडल्याने गंभीर जखमी झाली. याबाबत झालेल्या अपघाताची माहिती नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना समजली. त्यांनी तातडीने गंभीर जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यामुळे तिचा जीव बचावल्याचे सांगण्यात आले. वाडीवऱ्हे पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.