रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे नाॅर्थतर्फे इगतपुरी तालुक्यातील ४० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे नाॅर्थच्या माध्यमातुन इगतपुरी तालुक्यातील दूरवरून पायपीट करून शाळेत जाणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना मोफत नवीन सायकली वाटपाच कार्यक्रम टिटोली येथे संपन्न झाला. या प्रकल्पामुळे तालुक्यातील गोरगरीब घरातील अनेक विद्यार्थ्यांची पायपीट आणि श्रम कमी होणार आहेत. याप्रसंगी नवी सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावरून ओसंडुन वाहतांना दिसला.

टिटोली येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या सायकल वितरण कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे नाॅर्थच्या अध्यक्षा रूक्साना खान, महिला व मुली सक्षमीकरणाच्या प्रमुख आशमी, असीम नागरी, शिरिष तारे, उपसरपंच अनिल भोपे, देवराम म्हसणे, मुख्याध्यापक मंगला शार्दुल, नामदेव साबळे, दत्ता साबळे, समन्वयक वैभव गग, धनराज म्हसणे हजर होते. याप्रसंगी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रूक्साना खान यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास आम्ही सर्व प्रकारची मदत करू असे सांगितले. विद्यार्थिनींसह माता पालकांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. बोरली गावठा या वाडीवरील दुरवरून पाणी आणणाऱ्या आदिवासी महिलांचे श्रम कमी करण्यासाठी 40 लिटर क्षमतेचे वाॅटर व्हील्स वाटप करण्यात आले. इगतपुरी प्रकल्पामधुन आम्ही शाळा, विद्यार्थी, गावकरी, महिला यांना मदत करत असतो. सर्वांना चांगल्या सुविधा देण्याचा रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे नाॅर्थचा प्रयत्न असतो असे अध्यक्षा रूक्साना खान म्हणाल्या. सिद्धार्थ सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!