माणिकखांब येथे १ कोटी ३२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ : आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

ग्रामविकासासाठी एकत्र येऊन विकासाचे ध्येय गाठणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब गावाची कामगिरी कौतुकास्पद आहे. सक्षमतेने विविध कामांसाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांनी यापुढेही विकासगंगा आल्याशिवाय राहणार नाही. भैरवनाथ मंदिर भागात आणखी एक सभामंडप आणि उर्वरित कामे देण्यास वचनबद्ध आहे असे प्रतिपादन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले.

माणिकखांब येथे सरपंच अंजनाबाई चव्हाण, उपसरपंच … आदींसह ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने १ कोटी ३२ लाख ८० हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार हिरामण खोसकर बोलत होते. विकासाचा अजेंडा घेऊन काम करतांना माणिकखांब गावाने यापूर्वीही विकासाचा अजेंड्यावर चांगले काम केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. जेष्ठ नेते जनार्दनमामा माळी, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी सभापती रघुनाथ तोकडे, इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. आर. भाबड, पत्रकार भास्कर सोनवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आमदार खोसकर यांचे स्वीय सहाय्यक खंडू परदेशी, संदीप डावखर, ग्रामसेवक सोनवणे उपस्थित होते.

सूत्रसंचालन मनसेचे उपतालुकाप्रमुख भोलेनाथ चव्हाण यांनी केले. सरपंच अंजनाबाई चव्हाण, उपसरपंच भिमाबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण, अशोक पगारे, वर्षा म्हसणे, गंगाराम गांगड शिवसेनना शाखाप्रमुख भारत भटाटे माजी सरपंच लालु आडोळे, रतन चव्हाण, ज्ञानेश्वर भटाटे, प्रल्हाद भटाटे, बाळु चव्हाण, प्रा. गोपाळ लायरे, निवृत्ती चव्हाण, गोरख चव्हाण पोलीस पाटील उत्तम पगारे, मनोहर चव्हाण, कृष्णा आडोळे, नामदेव रखमा चव्हाण, तुकाराम चव्हाण, गोकुळ आडोळे, भरत चव्हाण, रामदास चव्हाण, भगवान भटाटे, अशोक चव्हाण, भाऊराव चव्हाण, सुरेश चव्हाण, अक्षय भटाटे, ज्ञानेश्वर आडोळे, शांताराम चव्हाण आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!