इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोल नाका येथे कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने आज पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. ट्रक पेट घेत असल्याचे घोटी टोलनाका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ ट्रक थांबवला. ट्रक ड्रायव्हरला ट्रक बाजूला घ्यायला सांगण्यात आले. ट्रक बाजूला घेतल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसून वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीतही आज मध्यरात्री आग लागली होती. आगीच्या आज दोन घटना घडल्या आहेत.